एक नवीन गोष्ट करतेय, पॉडकास्ट. अनेक वर्षं आकाशवाणीवर वृत्त निवेदनाचं तसंच निवेदनाचं काम केलं. गेल्या चार वर्षांपासून ब्लॉगिंग करतेय. तितकीच वर्षं डिजिटल अंकाचंही काम केलं. गेल्या वर्षीपासून साडी डिझायनिंगची मजा अनुभवतेय. आणि आता पॉडकास्ट.
हा माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. सर्वस्वी वेगळा. थोडाफार आकाशवाणीसारखाच. सईबरोबर रेकॉर्डिंग करायला खूप मजा आली. जणू काही गप्पा मारतोय असंच वाटलं. ऐकून बघा. कसं वाटतंय ते जरूर सांगा. कुठल्या विशिष्ट विषयावर बोलावं असं वाटत असेल तर नक्की कळवा.
ऐका फूड विथ सायली, स्टोरीटेलवर. स्टोरीटेलचं app Google Play Store वरून डाउनलोड करा. १४ दिवसांची फ्री ट्रायल आहे. नंतर वर्गणी भरावी लागेल. या app वर अनेक पुस्तकं, पॉडकास्ट ऐकता येतील.

https://www.storytel.com/in/en/books/675841-Food-with-Sayali-Rajadhyaksha