सचिन पिळगावकर, ५० वर्ष फिल्म इंडस्ट्री मध्ये कार्यरत असणारा अद्वितीय माणूस…. मागची पिढी त्यांना बालकलाकार म्हणून ओळखते, मधल्या पिढीला ते मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ गाजवलेले तरुण अभिनेते म्हणून माहित आहेत, तर नवीन पिढी त्यांना शंभराची नोट देणारे महागुरू म्हणून ओळखते. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उत्तम गायक अशा विविध भूमिकांमधून सचिन हे नाव मराठी प्रेक्षकांना परिचित आहे. फक्त मराठीच नव्हे तर, नदीयाके पार सारख्या हिंदीतील सुपरहिट सिनेमांमुळे उत्तर भारतातही ते प्रचंड लोकप्रिय आहेत. सोशल मीडिया सारख्या नवीन माध्यमावर देखील त्यांना चाहते फॉलो करतात. पण त्याच बरोबर सोशल मिडीयावर ‘हेट पेज’ असणारे सचिन पिळगावकर हे एकमेव मराठी कलाकार आहेत. एकीकडे सर्व वयोगटातील प्रचंड चाहते तर दुसरीकडे तेवढच ट्रोलिंग, असं काहीतरी अजब रसायन आहेत सचिन पिळगावकर…

पब्लिक म्हणून आपल्या आवडत्या कलाकारावर प्रेम करण्याचा आणि टीका करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असतोच पण एखाद्या कलाकाराबद्दल आपलं मत निश्चित करण्या आधी त्याला जाणून घेतलं पाहिजे. असाच ‘जाणून’ घेण्याचा प्रयत्न स्टोरीटेल ने केलाय ‘स्पॉटलाईट सचिन’ या आपल्या खास पॉडकास्टच्या माध्यमातून… खरंतर सचिन यांचं व्यक्तिमत्व ३० मिनिटांच्या पॉडकास्ट मध्ये पकडणं कठीण, आणि म्हणूनच स्टोरीटेल ने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू घेऊन सुरुवात केली आहे. सचिन आणि त्यांचं उर्दू भाषेवरील प्रेम आणि ज्ञान, हा विषय घेऊन आपल्या श्रोत्यांकरिता हा पॉडकास्ट रेकॉर्ड केला आहे. दादरच्या टायकलवाडीत राहणाऱ्या, पिळगावकर आडनाव लावणाऱ्या, मराठी मुलाच्या आयुष्यात उर्दू भाषा आली कशी ? आणि या प्रश्नाचं उत्तर जर सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी असं असेल तर त्यामागची खरी गोष्ट ऐकणे नक्कीच इंटरेस्टिंग असेल. मीना आपांच्या पश्चात मजरुह सुलतानपुरी याचा शेजार लाभल्या नंतर छोट्या सचिनच्या उर्दू शिकण्यावर त्याचा कसा परिणाम झाला? ईदच्या दिवशी मजरुह साहेबांनी असं काय केलं ज्याने सचिनचं आयुष्यच बदलून गेलं ? अभिनेते आणि डायलॉग रायटर कादर खान यांच्या सोबत एका उर्दू शब्दाच्या अर्थावरून काय किस्सा घडला होता? त्याचप्रमाणे स्वत: सचिन यांनी केलेली उर्दू शायरी आणि त्याविषयीच्या गप्पा…. हे सगळं ऐकण्यात आणि त्यातून सचिन पिळगांवकर समजून घेणे अत्यंत इंटरेस्टिंग असेल. सचिनजींच्या टीम मध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या योगेश गायकवाड याच्यावर सचिनजींशी याविषयावर बोलतं करण्याची जबाबदारी स्टोरीटेलने सोपवली आणि या पॉडकास्ट ला पर्सनल गप्पांच्या मैफिलीचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. सचिन पिळगावकरांनी देखील हे त्यांचं पाहिलं वहिलं पॉडकास्ट रेकॉर्डिंग असल्याने अत्यंत उत्साहाने त्यात सहभाग घेत फिल्म इंडस्ट्री मधील अनेक इंटरेस्टिंग किस्से सांगितले आहेत. काहीतरी वेगळ्या कन्टेन्ट च्या शोधात असणाऱ्या स्टोरीटेलच्या चोखंदळ श्रोत्यांना हा प्रयत्न नक्की आवडेल. तेंव्हा खालील लिंक क्लीक करून स्टोरीटेल ऍप लाऊनलोड करा आणि स्पॉटलाईट सचिन बरोबरच ऑडिओ बुक्सच्या जगातील आमची इतरही क्रिएशन्स ऐका. आपल्याला आवडलं तर इतरांशी देखील शेअर करा.
Listen to the full Podcast here: Spotlight with Sachin