साहिर आणि अनुजा दोघं एकत्रं फ्लॅट घेऊन राहतायत. लिव्ह इनमध्ये. दोघांचं सगळं उत्तम सुरू आहे आणि एकदिवस अचानक साहिरचे आईवडिल घरात येतात आणि त्यांना कळतं आपला मुलगा एका मुलीसोबत राहतोय. मग काय अनुजाच्या आईवडिलांना पण खबर पोहोचते. आणि साहिरचे टिपिकल मुंबईचे दोघंही नोकरी करणारे आईवडिल आणि अनुजाचे कोल्हापूरचे जून्या विचारांचे पुरुषप्रधानता मानणारे आईवडिल समोरसमोर येतात. दोन्ही पालकांचं एकाच गोष्टीवर एकमत होतं. लग्नं. पण अनुजाला लग्नं नकोय आणि साहिरला वाटतं काय हरकते. आणि सुरू होतो लोचा.मग पुढे काय होतं…..घरच्यांना लग्न न करण्यासाठी पटवतात की दबावाला झूकून लग्न करतात. अनुजाला खरंच साहिरबरोबर कायम रहायचं असतं की नसतं या सगळ्यांची उत्तरं ऐकण्यासाठी प्रेमिकल लोचा ही सिरीज ऐकावी लागेल.
ही गोष्ट लिहीली आहे मनस्विनी लता रविंद्र यांनी आणि त्याला आवाज दिला आहे आरती मोरे आणि ओंकार गोवर्धन यांनी.
https://www.storytel.com/in/en/series/73453-Premical-Locha
